top of page

म्हणून रिजर्व बँक छापत नाही अनलिमिटेड पैसा

  • Writer: जय महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र
  • Feb 12, 2019
  • 2 min read


ree

प्रत्येकाला वाटत की आपण श्रीमंत व्हावं. आणि मला तर नेहमी प्रश्न पडायचा की भारतात एवढी गरिबी आहे. गोव्हर्नमेंट का बरं अमाप पैसा छापत नाही! आणि गरिबांना वाटत नाही. आता या मागील कारण नक्की काय आहे ते बघा.

२००१ साली याअगोदर झिम्बाब्वे या देशाने अस केलं होतं. झिम्बाब्वे हा अत्यंत गरीब देश.. अर्थात खाण्याचे ही वांदे असलेला देश. ही एवढी गरिबी बघून तेथील राष्ट्राध्यक्षाला वाटलं जर आपण अमाप नोटा छापल्या आणि सर्व जनतेला वाटल्या तर आपला अक्खा देश श्रीमंत होईल. अर्थात ही कल्पना त्याच्या विचाराने योग्य होती परंतु जर देशाच्या जीडीपी नुसार जर विचार केला तर अशाने अक्खा देश भिकेला लागेल! आता बघा ते कसं?

ree

उदाहरणार्थ जर एका दुकानात 1च किलो तांदूळ आहे. आणि दोन व्यक्ती आहेत त्यापैकी 1 श्रीमंत तर एक गरीब दोघांकडे ही 10 10 रुपये आहेत. दुकानदार तो तांदूळ कोणाला देणार? निश्चितच जो अगोदर तिथे जाईल..

आता अजून इक हवं तर हेच उदाहरण घ्या.. परंतु आता गरीबकडे 20 रुपये तर त्या श्रीमंत व्यक्तीकडे सुद्धा 20rs आहेत आणि तांदूळ फक्त एक किलो.. तर काय त्या तांदळाची किमंत आपोआप वाढेल तो दुकानदार तोच तांदूळ आता 20rs किलोने लावेल.. होतंय काय तर वस्तू तेवढीच मिळते पण किंमत वाढतेय म्हणून होईल काय महागाई वाढेल.

आणि म्हणूनच जेव्हा झिम्बाब्वे ने अस केलं तेव्हा त्यांना केवळ 2 रुपयांच्या वस्तू साठी सुद्धा चक्क पोतभर पैसा न्यावा लागायचा. आणि यावेळेस जी मोदी सरकारने नोटबंदी तोही एकप्रकारे याचा च भाग.. आता बघा यापूर्वी च्या सरकारने अमाप भ्रष्टाचार केलेला आणि तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही एवढा पैसा गोळा केलेला. त्यामुळे गरीब बिचारा गरीब च राहू लागला आणि श्रीमंत मात्र आणखी श्रीमंत होत गेला आणि म्हणूनच.. मोदी सरकारने रात्रीतून या गोष्टीच्या मुसक्या आवळल्या..


ree

आणि संगण्यासारखी गोष्ट अशी की बाजारात जेव्हढा आवक उपलब्ध आहे.. तेवढाच पैसा आरबीआय छापत असते. म्हणून जर तुम्हला कोणी बोललं.. की सरकार अस का करत नाही तर त्याला एकवेळ ही गोष्ट नक्की समजून सांगा..

आणि तुम्हाला आमचा लेख आवडल्यास पोस्टला लाईक करा तसेच आपल्या मित्रजनांसोबत शेयर नक्की करा.. जय हिंद.. जय भारत..

Comments


bottom of page