top of page

मोदी सरकारचा मोठा निर्णय, “१ फेब्रुवारीपासून पॅनकार्ड शिवाय नाही होणार हि ५ मोठी कामे”

  • Writer: जय महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र
  • Feb 12, 2019
  • 1 min read

देशातील अनेक योजनांचा फायदा उचलण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्यातील पॅनकार्ड हे देखील एक महत्वाचे आहे. लहान सहन गोष्टींपासून आता मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी देखील पॅनकार्ड आता अनिवार्य करत आहेत. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही त्यांनी बनवून घ्या कारण आता भविष्यात आधारकार्ड सोबत पॅनकार्ड देखील महत्वाचे होणार आहे. बँकेतील कामासाठी तर पॅनकार्ड गरजेचे असतेच कारण पॅनकार्डवर असणाऱ्या पॅन नंबर वर तुमचा आर्थिक डेटा जोडलेला असतो आणि यामुळे सरकारला तुमच्या व्यवहारावर देखरेख ठेवता येते. अनेक लोक वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडतात पण पॅनकार्ड दिलेले असल्यामुळे सर्व बँकांचे व्यवहार एकाच पॅनकार्डवर जातात. आता आपण मोठ्या ५ ठिकाणी अनिवार्य केले गेलेले आहे त्याविषयी जाणून घेऊ.


ree

पॅनकार्ड नसेल तर तुम्ही कोणतीच गाडी विकत घेऊ शकत नाही होय हे खरे आहे १ फेब्रुवारीपासून बाईक अथवा कार कोणतीही गाडी घेण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. दुसरं म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरु करत असाल तर तुमच्याकडे पॅनकार्ड असंन गरजेचं आहे अन्यथा व्यवसाय करता येणार नाही. छोटा व्यवसाय असो किंवा मोठा व्यवसाय असो पॅनकार्ड लागेलच.


ree

तिसरं म्हणजे तुम्ही बँकेतून अडीच लाखांपेक्षा जास्त ची किंवा अडीच लाखांची देवाणघेवाण करत असाल तर पॅनकार्ड देणे गरजेचे आहे. जर नसेल पॅनकार्ड तर तुम्हाला व्यवहार करता येणार नाही आणि तुम्ही अडचणीत अडकू शकता. चौथ म्हणजे शेअर्स खरेदी करण्यासाठी देखील पॅनकार्ड महत्वाचे आहे. शेअर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पॅनकार्ड देणे गरजेचे आहे. पाचवं आणि शेवटचं म्हणजे बँकेत पैसे जमा करण्यासाठी देखील पॅनकार्ड आता गरजेचे आहे, जर तुम्ही बँक अकाउंट मध्ये ५०,००० रुपये अथवा त्याहून जास्त पैसे जमा करत असाल तर पॅनकार्ड देणे अनिवार्य आहे मग ते स्वतःचे अकाउंट असो किंवा दुसऱ्यांचे.

तुम्हाला आमचा लेख आवडल्यास पोस्टला लाईक करा तसेच आपल्या मित्रजनांसोबत शेयर नक्की करा.. जय हिंद.. जय भारत..

Comments


bottom of page