top of page

जेमिमा रॉड्रिग्जची आयसीसी क्रमवारीत दुसर्‍या स्थानी , तर स्मृती मानधना सहाव्या स्थानी झेप

  • Writer: जय महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र
  • Feb 17, 2019
  • 1 min read

भारतीय युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने आपल्या सातत्यपूर्ण  कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी 20 क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेतली असून ती आता दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. त्याचवेळी  हुकमी  फलंदाज स्मृती  मानधनानेही चार स्थानांनी प्रगती केली असून ती आता सहाव्या स्थानी आहे. भारताला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडनने 3-0 ने पराभूत  केले आहे.मात्र रॉड्रिग्ज  आणि मानधना यांनी प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत आपले नाणे खणखणीत वाजवले.


ree

जेमिमा ने  तीन सामन्यांच्या मालिकेत  132 धावा  केल्या आहेत , तर  मानधनाने   180 धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर मानधनाला स्थानी चार स्थानांचा लाभ झाला आहे.गोलंदाजांमध्ये  फिरकीपटू  राधा यादवने 18 स्थानांची उडी घेताना दहावे स्थान पटकावले असून, दीप्ती शर्मा ने पाच स्थानांची प्रगती केली असून ती आता 14 व्या स्थानी आहे. न्यूझीलंडची सोपी डिवाईन 11 व्या स्थानावरून आठव्या स्थानी दाखल झाली आहे. कर्णधार एमी सॅटर्थवेट 23 वरून 17 व्या स्थानी पोहोचली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीजची डिएंड्रा डॉटिन अव्वल स्थानीआहे .फलंदाजांमध्ये पाकिस्तानची बिसमाह मारुफने तीन स्थानांची प्रगती करत पंधरावे स्थान गाठले आहे. एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर असलेली सना मीरने सहा स्थानांची उडी घेत 28 वे स्थान पटकावले आहे. संघाच्या क्रमवारीत न्यूझीलंडने इंग्लंडला मागे टाकले असून दुसरे स्थान गाठले आहे .ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी असून भारतीय महिला पाचव्या स्थानी आहे.


ree

तुम्हाला आमचा लेख आवडल्यास पोस्टला लाईक करा तसेच आपल्या मित्रजनांसोबत शेयर नक्की करा.. जय हिंद.. जय भारत..

Comments


bottom of page